नुकतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी हा परीक्षेचा काळ आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि मविआतील नेत्यांनी आता दंड थोपटले आहेत.
महायुतीकडून केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्यात आलं. रिपोर्ट कार्डमधून महायुतीने अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा यावेळी मांडला. मविआच्या गद्दारांच्या पंचनाम्याला रिपोर्ट कार्डने उत्तर देण्यात आलं. तसेच यावेळी राज्यात परिवर्तन घडवणाऱ्या योजना आणल्याचा दावा महायुतीने केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशाने विरोधक सैरभर झाल्याचा टोला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याची परंपरा असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, हे 'महायुतीचं रिपोर्ट कार्ड नाही, डिपोर्ट कार्ड आहे' असं म्हणत विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.