महापालिकेचे अधिकारी आणि ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता 'चोर मचाये शोर'चा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहेत. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन करणार आहे.