आगामी विधान सभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. यातच महायुतीने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची उमेदवाराची घोषणा केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा विश्वास हसन मुश्रीफांना होता. त्यामुळे 'यंदाही सिक्स मारणार फिक्स' असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांना सहाव्यांदा आमदार करण्याचा निश्चय केला आहे. मुश्रीफ यांना इतक्या उचांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
हसन मुश्रीफांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे. या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता.
हसन मुश्रीफ हे पवार कुटुंबीयांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जायचे. शरद पवारांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी होती. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली. महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा विश्वास हसन मुश्रीफांना होता. त्यामुळे 'यंदाही सिक्स मारणार फिक्स' असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांना सहाव्यांदा आमदार करण्याचा निश्चय केला आहे.