Vidhansabha Election Lokshahi
ताज्या बातम्या

Vidhansabha Election: विधानसभेची रणधुमाळी! महाविकास आघाडीचं जागावाटपाचं ठरलं; ९६-९६-९६ जागांचा फॉर्म्युला?

Published by : Naresh Shende

Vidhansabha Election Mahavikas Aaghadi Seat Sharing: लोकसभा निवडणुकीत ३१ जागा जिंकून महायुतीला घाम फोडणाऱ्या महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोट बांधायला सुरुवात केलीय. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून खलबतं सुरु आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची मोठी अपडेट समोर आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा ९६-९६-९६ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं जागावाटप निश्चित झाल्याचं कळतं आहे. मविआत जवळपास समसमान जागावाटपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता काँग्रेसचा काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे आणि पवार गटात जागावाटपासंदर्भात चर्चा झालीय. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • कोणत्याही अडचणी आल्या तरी, मविआ एकत्रच निवडणूक लढणार

  • ठाकरे गट-पवार गटात कोणत्या जागा लढायच्या, यावर चर्चा झालीय.

  • काँग्रेसकडून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांची चाचपणी सुरुच आहे.

  • विदर्भात काँग्रेस आणि पवार गटाला अधिक जागा मिळण्याची शक्यता

  • काँग्रेस आणि ठाकरे गट आपापल्या कोट्यातून मित्र पक्षांना जागा देण्याची शक्यता

  • जिंकेल त्याला जागा द्यावी, अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याचं समजते.

  • तिन्ही पक्षांत सध्या अंतर्गत सर्व्हे सुरु, उमेदवारांची चाचपणी सुरु

  • मुंबईत २ ते ३ वेळा सामूहिक बैठक पार पडली, जागांवर प्राथमिक चर्चा

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...

IND vs BAN: पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा केला 280 धावांनी पराभव; मालिका 1-0 ने जिंकली

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर