महेश महाले, नाशिक
देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विविध ठिकाणी महापूजा महाआरती तसेच अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालीय. अडीच ते तीन किलोमीटर पर्यंत दर्शन रांग लागलीय.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलीय. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून भोले भक्त त्र्यंबकला येतात. हर हर महादेवाचा गजर करत भोले भक्त त्र्यंबक राज्याच्या चरणी लीन होत आहेत. मंदिर प्रशासनाने गर्दीचा विचार करत व्हीआयपी दर्शनासाठी पास बंधनकारक केलाय. पोलिसांनी यावेळी मंदिर परिसरात सुरक्षा वाढवली आहे.