विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाने शिंदे गटातील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यातच आता अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यानंतर आता शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, मात्र सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही.
कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे. महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक-24 मधील शेत जमिनीवर अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.