प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला असतो. पण यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची वर्तवण्यात येत आहे. रोटेशन पद्धतीने निवड होत असल्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी संधी नसणार आहे. राजपथावरचं हे संचलन ठराविक वेळेतच पूर्ण व्हावं लागतं, त्यामुळे दरवर्षी ठराविक राज्यांनाच यात संधी मिळते.
गेल्या वर्षीचा चित्ररथ जैवविविधता या विषयावर आधारित होता. 1980 मध्ये साकारलेला 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता. तसेच पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. 2018मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता.
2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये नव्हता. त्यानंतर दोन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे.अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. पण रोटेशन पद्धतीने निवड होत असल्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी संधी नसणार आहे