हिवाळा सुरू झाला असून गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागलीये. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचं किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्यानं राज्यात थंडीचं प्रमाण आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच हार्ट अटॅकचा धोका देखील वाढलाय. त्यामुळे कुठेही हार्ट अटॅक येण्याच्या समस्या गंभीररित्या वाढल्यात.
2 दिवसांपूर्वी फरीबादमधला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात एका मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला गेलेल्या एका तरुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. अति थंडीत रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता होऊ शकते. अपूर्ण झोपही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं, त्यामुळे रात्रीच्या वेळी 7 ते 8 तासांची झोपं आवश्यक आहे. व्यवस्थित झोपेमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज किमान 30 मिनटं व्यायाम करा, पण थंडीच्या दिवसात पहाटे किंवा रात्रीच्या गारठ्यात व्यायाम करणं शक्यतो टाळा.शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा, सतत ताण घेतल्याने हृदयाच्या धमन्यांना सूज येते त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात परिणामी हार्ट अटॅकची शक्यता वाढते. रोजच्या आहाराकडे लक्ष द्या. आहारात मीठ, साखर आवश्यक त्या प्रमाणातच वापरा. आहारात जास्त मीट वापरल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, तर साखरेमुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते.