अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसला.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता.
मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे.. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाली आहे.