थोडक्यात
दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज
तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार
दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण निर्माण
दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याची माहिती मिळत आहे.
आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.