मुंबईत जोरदार पावसाने गुरुवारी संध्याकाळपासून हजेरी लावली होती. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. मान्सून परतीचा प्रवास सुरु असून राज्यातील अनेक भागांत पाऊस होत आहे.
पुढील चार दिवसांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भासह राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून राज्यातील परतीच्या पावसाबद्दल 15 ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होण्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
परतीच्या पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पूर्वेकडून वाहणारे वारे सक्रिय झाले असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून 29 जिल्ह्यांना पावसाच रेड अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतून म्हणजेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकणात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.