ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis LIVE : शरद पवारांची पत्रकार परिषद Live

Shweta Chavan-Zagade

शरद पवारांची पत्रकार परिषद Live

अडीच वर्षात मविआने मोठे निर्णय घेतली

आमचं काम पाहता मविआ प्रयोग फसला म्हणणं हे राजकीय अज्ञान

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्यानं उत्तम कामगिरी केली, हे सर्व पाहिल्यानंतर हा प्रयोग फसलाय म्हणणं, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद इथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीनं नेलं ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल – शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार Live  

राष्ट्रवादी मुख्यमंत्री ठाकरेंना शेवटपर्यंत पाठिंबा देणार

राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत

आघाडी सरकार टिकवण्याची आमची भूमिका

निधीवरून माझ्यावर आरोप होत आहेत

अडीच वर्षात निधीला कुठेही काटछाट केली नाही

निधीबाबत कुठलाही दुजाभाव केला नाही

राऊतांनी अगोदर 25 वर्ष मविआ सरकार टिकेल असं म्हटलं होतं

आमदारांना परत आणण्यासाठी राऊतांनी तसे वक्तव्य केले असावे

सर्वांनी मिळून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि बंड केल्याची चर्चा असलेलले औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत देखील औरंगाबादेत दाखल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सर्व जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार 

नाना पटोले Live -

महाविकास आघाडीला कॉंग्रेसचं समर्थन कायम

भाजपला रोखण्यासाठी आम्ही आजही मविआसोबत

संजय राऊतांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चा

मविआ सरकार 5 वर्ष कायम राहील

कॉंग्रेस कायमच मविआसोबत राहणार

भाजपनेच हा भूकंप घडवून आणला

सरकार पाडण्यासाठी भाजपची कारस्थानं

संजय राऊतांचे पुन्हा एक ट्विट 

घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊत यांची बंडखोरांना पुन्हा ट्विटद्वारे साद 'चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

रवींद्र फाटक हेसुद्धा गुवाहटीला दाखल झाले आहेत. फाटक हे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला समजावण्यासाठी गेले होते. तेच फाटक आता गुवाहटीला पोहोचले आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत दादा भुसे आणि संजय राठोड हेसुद्धा आहेत 

"भाजपाकडून आमदारांचे हे हाल, तर सामान्य जनतेचं काय?"; नाना पटोलेंचा सवाल 

उद्धव ठाकरेंविरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही - सुभाष देसाई 

वाय. बी. चव्हाण सेंटरमधून छगन भुजबळ Live 

सत्ता येते, सत्ता जाते, सत्तेची चिंता नसते

सत्तेतून कुणी बाहेर पडलं तरी नवं नाही

मविआशी चर्चा करून विधानं करा

प्रत्येक पक्षामध्ये कुरबुरी असतात

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूतीने उभा

दिपक केसरकर, आशिष जैस्वाल गुवाहाटीतल्या हॉटेलमधून बाहेर पडले

जयंत पाटील Live 

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली नाही

सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागेल त्यात नवीन नाही

शिवसेनेला आमदार किती आहेत याची सध्या चिंता करण्याची गरज नाही

वर्षा सोडून मातोश्रीवर जाण हा ठाकरेंचं व्यक्तिगत निर्णय

उध्दव ठाकरे आजही मुख्यमंत्री आहेत

एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत काय ठरलं? 

रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक संपली, या बैठकीत सर्व आमदारांनी मिळून शिंदेंसोबतच पुढचा लढा द्यायचा असा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही - पृथ्वीराज चव्हाण

एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं संख्याबळ केवळ दिखावा - नाना पटोले

सरकारमधून बाहेर पडण्यास तयार - संजय राऊत 

एकनाथ शिंदे गटाचं ४२ आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन

गुवाहाटीत रेडिसन ब्लू बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं, पोलिसांनी घेतलं ताब्यात 

आम्ही शिवसेना सोडलेली नाही , मुख्यमंत्री यांनी आम्हाला वर्षावर जाण्याचे आदेश दिले आहेत - संजय जाधव, परभणी खासदार

'ही आहे शिवसेना आमदारांची भावना' एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट उद्धव ठाकरेंना पाठवलं दोन पानी पत्र

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीची गेल्या दोन तासांपासून बैठक

देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची खलबतं

देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची खलबतं, सागर बंगल्यावर खासदार आमदारांच्या गाठीभेटी, प्रसाद लाड, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, श्रीकांत भारतीय सागर बंगल्यावर

मुख्यमंत्री मंत्रालयातील सर्व सचिवांना ऑनलाईन संबोधित करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना साडे बारा वाजता ऑनलाईन संबोधित करणार, राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहाणार, या व्यतिरिक्त इतर सचिवही उपस्थित राहाणार

तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन बाहेर आंदोलन, पोलिसांकडून पदाधिकारी ताब्यात

उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता, राहील, गेलेले आमदार परत येतील - जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस 

ठाकरे साहेबांच्या बरोबर राहावं आणि त्यांना सरकार करण्यासाठी प्रयत्न करावेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.

दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दीपाली सय्यद यांचे ट्विट 

मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नाहीत - संजय राऊत 

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला