ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis LIVE : एकनाथ शिंदे आजच मुंबईत येणार, सुत्रांची माहिती

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता आठवडा पूर्ण झाला आहे. या काळात शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता केवळ आदित्य ठाकरे ठाकरे गटात राहिले आहेत. दरम्यान, शिंदे ठाकरे वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दोन्ही गटांनी आपल्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उभी केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या सर्व घडामोडींचे आणि क्षणाक्षणाचे (Maharashtra Political Crisis) अपडेट्स जाणून घ्या...

Shweta Chavan-Zagade

 एकनाथ शिंदे आजच मुंबईत येणार, सुत्रांची माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोमणा 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे 

सुप्रिम कोर्टाने बंडखोर आमदारांना 11 जुलै पर्यत दिलासा आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

20 बंडखोर आमदार आमच्या संपर्कात, दगाफटका झाला तर हे आमदार शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील; अनिल देसाईंचा दावा 

मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबतची बैठक संपली

मनसे नेत्यांची अध्यक्ष राज ठाकरेंसोबतची बैठक संपली आहे. मनसे वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

भाजपाचा ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव? कोअर कमिटीची पाच वाजता बैठक 

विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दुपारी ५ वाजता भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात राजकारण नाही, आता सर्कस झाली - आदित्य ठाकरे

दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारची ही सगळी स्क्रिप्ट : नाना पटोले 

आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्ता यांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना 

३९ आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्ता यांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला केली आहे.

११ जुलैपर्यंत आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, नोटीस बजावलेल्या आमदारांना ११ जुलैच्या संध्याकाळपर्यंत मुदत 

नरहरी झिरवाळ, अजय चौधरी यांना नोटीस 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे.

विधानसभा उपाध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस, सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी 11 जुलैला 

अविश्वासाची नोटीस वैध की अवैध? सुप्रीम कोर्टात युक्तिवाद 

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी वैध मेल आयडीवरुन नोटीस आली नसल्याने अविश्वास प्रस्ताव फेटाळला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “नोंदणीकृत ईमेलवरून अविश्वास प्रस्ताव नोटीस पाठवण्यात आली नव्हती. विधिमंडळ कार्यालयात पाठविण्यात आली नाही. उपसभापती न्यायिक क्षमतेने काम करतात. जर कोणी नोंदणीकृत कार्यालयातून पत्र पाठवलं नाही तर ते आपण कोण अशी विचारणा करु शकतात. हा मेल वकील विशाल आचार्य यांनी पाठवला होता”.

यावर न्यायमूर्तींनी याबाबत आमदारांना विचारणा केली होती का? अशी विचारणा केली. त्यावर धवन यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.

"उपाध्यक्षांना अज्ञात ईमेल आयडीवरुन पत्र मिळाल्याने त्यांनी प्रस्ताव फेटाळला" 

अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी सांगितलं की, उपाध्यक्षांना अज्ञात ईमेल आयडीवरुन पत्र मिळाल्याने त्यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळला होता. हे पत्र म्हणजे प्रस्ताव नसल्याचं सांगत फेटाळला होता. २० तारखेला सर्व आमदार सूरतला गेले आणि २१ तारखेला त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडणारा मेल लिहिला असावा. २२ तारखेला अध्यक्षांना हा मेल मिळाला. यावेळी १४ दिवसांचा नियम पाळण्यात आला नाही असं सिंघवी यांनी यावेळी सांगितलं.

"उच्च न्यायालयात का गेला नाहीत?"; सर्वोच्च न्यायालयाची विचारणा; बंडखोर शिंदे गटाचे वकील म्हणाले... 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड करणाऱ्या गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिंदे गटाला या प्रकरणात आधी उच्च न्यायालयात का गेले नाहीत? अशी विचारणा केली आहे. यावर शिंदे गटाच्या वकिलांकडून या प्रकरणाचं गांभीर्य पाहून आपण सर्वोच्च न्यायालयात आल्याचा युक्तिवाद केला.

उपाध्यक्षांनी 14 दिवसांत प्रस्ताव सभागृहात मांडणं गरजेचं होतं, मात्र त्यापूर्वीच आमदारांना नोटीस, सुप्रीम कोर्टाचं मत 

उपाध्यक्षांनी 14 दिवसांत प्रस्ताव सभागृहात मांडणं गरजेचं होतं, मात्र त्यापूर्वीच आमदारांना नोटीस, सुप्रीम कोर्टाचं मत तर प्रस्ताव अधिकृत ई मेलवरुन न पाठवल्यानं प्रस्ताव फेटाळला, उपाध्यक्षांचे वकील धवन यांचा युक्तिवाद

सुनावणी सभागृहाच्या प्रक्रियेबद्दल आहे का ? सुप्रीम कोर्टाची विचारणा

अभिषेक मनु सिंघवी यांनी 'किहोतो' प्रकरणाचा दाखला दिल्यानंतर कोर्टाने प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं असं निदर्शनास आणून दिलं. तसंच आजची सुनावणी सभागृहाच्या प्रक्रियेबद्दल आहे का ? अशी विचारणाही सिंघवी यांना केली.

होय हा विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप - अभिषेक मनू सिंघवी 

न्यायमूर्ती कांत यांनी यावेळी पण आपण विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहोत का? अशी विचारणा केली. यावर सिंघवी यांनी होय, नोटीस दिली नाही, दोन दिवसांची नोटीस पुरेशी नाही असे प्रश्न विचारणं हा हस्तक्षेप असल्याचं सांगितलं.

थेट सुप्रीम कोर्टात दाद का मागितली? शिवसेनेची बाजू मांडणारे सिंघवी यांचा प्रश्न

शिवसेना विधीमंडळ पक्ष आणि प्रतोद सुनील प्रभू यांची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी थेट सुप्रीम कोर्टात दाद का मागण्यात आली? अशी विचारणा केली आहे. प्रथम हायकोर्टात दाद का मागितली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत अध्यक्ष निर्णय घेत नाहीत तोवर न्यायालय हस्तक्षेप करत नाहीत अशी बाजू मांडताना राजस्थान आणि मणिपूरमधील निर्णयाचे दाखले दिले.

नियमांचं पालन न करता नोटीस - शिंदेंचे वकील 

सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू नाही. अधिवेशन चालू नसेल, तर मंत्रिमंडळ बैठक बोलावण्याची शिफारस करू शकते किंवा विधानसभा बोलावून कार्यवाही केली जाऊ शकते. पण नियमांचं पालन न करता नोटीस बजावली आहे असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांकडून कऱण्यात आला आहे.

शिंदेंच्या वकिलांकडून नियमांवर बोट 

शिंदे गटाचे वकील कौल यांनी कलम १७९ चा संदर्भ दिला आहे जो सभापती आणि उपसभापतींना हटवण्याशी संबंधित आहे. तसंच महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११ चाही संदर्भ दिला आहे. नोटीस दिल्यानंतर १४ दिवसांचा नियम पाळण्यात आला नसल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे हकालपट्टीच्या प्रश्नावर निर्णय होत नाही तोपर्यंत हा विषय हाताळण्याचा सभापतींना अधिकार नाही असंही सांगण्यात आली.

मला फाशीवर चढवा पण मी गुवाहाटीला जाणार नाही - संजय राऊत

शिवसेनेला रोखण्यासाठी काही लोकं एकत्र येत आहेत

हायकोर्टात का गेला नाहीत? सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला विचारणा 

एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही, ईडीच्या समन्सवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया 

बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केल्याची सूत्रांची माहिती

बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केल्याची सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतले असल्याची माहिती

एकदाच शिंदे यांच्याकडे असलेले नगर विकास खाते सुभाष देसाई यांच्याकडे दिले असल्याची माहिती

गुलाबराव पाटील यांच्या जवळील जलसंपदा हे अनील परब यांना देण्यात आले

दादा भुसे यांचे कृषी खातं हे शंकराव गडाख यांच्याकडे

उदय सामंत यांच्या कंडचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आदित्य ठाकरे

शंभूराजे देसाई यांचे खातं संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आला

यड्रावकर यांचे खातं विश्वजीत कदम यांच्याकडे देण्यात आल

अब्दुल सत्तार यांचे खातं प्राजक्त तनपुरे यांच्याकडे

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केला आहे 

बंडखोर मंत्र्यांंना दुय्यम खात्यांच वाटप, मंत्रिमंडळात फेरबदल

बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केल्याची सूत्रांची माहिती

खासदार संजय राऊतांना ईडीचं समन्स, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

धमक्या देणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये, श्रीकांत शिंदेंचं संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना उत्तर 

संजय राऊतांना ईडीचं समन्स आल्याची चर्चा 

महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे, शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठविल्याचा दावा

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे पत्र शिंदे गटाने राज्यपालांना पत्र दिल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदे गटाकडे ३९हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपने 3 हजार कोटी खर्च केले - नाना पटोले

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने 3 हजार कोटी खर्च केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी केला

महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे, शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठविल्याचा दावा 

शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला, मविआ सरकार अल्पमतात असल्याचा दावा 

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा केंद्राचा प्रयत्न - नाना पटोले 

आमचा गट हा मूळ शिवसेना पक्ष आहे, त्याचे नेते एकनाथ शिंदे - दीपक केसरकर 

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे.

मुंबई- देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मोठ्या राजकीय हालचाली हालचाली सुरू आहेत

एकनाथ शिंदे यांची याचिका दुपारी १२ नंतर सुनावणीला येण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर एकनाथ शिंदे यांची याचिका सुनावणीला येणार आहे. आज दुपारी 12 ते 12.30 नंतर याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना पुन्हा सवाल, छगन भुजबळ सत्तेत असल्याबाबत घेतला आक्षेप 

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय