Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

Live Update : जातनिहाय जनगणना, ईव्हीएमवर बंदीसाठी उद्या भारत बंद, 'या' संघटनेचं आवाहन

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी... मुंबई आणि महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी जाणून घ्या...

Shweta Chavan-Zagade

केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट अजूनही फेसबुकवर...वादग्रस्त पोस्ट डिलिट करण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांचा हलगर्जीपणा....13 मे रोजीची पोस्ट 12 दिवसांनंतरही तशीच कायम...केतकीच्या पोस्टला 13 हजार लाइक्स, 11 हजार कॉमेट्स

अटकपूर्व जामीन मात्र कागदोपत्री अटक

गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सिल्वर ओकवर हल्लाप्रकरणी आरोपी.. जयश्री पाटलांना अटकपूर्व जामीन मंजूर मात्र कागदोपत्री अटक .. जयश्री पाटलांना कागदोपत्री अटक दाखवून 25 हजारांचा टेबल जामीन दिला जाणार..

संभाजीराजे घेणार शिवसेनेच्या शिष्टमंडळाची भेट

ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मे रोजी

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस LIVE

31 मे रोजी मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण - फडणवीस

अलिकडच्या काळात बोलघेवड्या नेत्यांची मालिका - फडणवीस

सामान्य माणसाला शक्तिशाली करण्याचे काम मोदींनी केले - फडणवीस

ठोस उपाययोजना करणारा देश म्हणते भारत - फडणवीस

कितीही टीका झाली तरी मोदींना आपली दिशा बदलली नाही - फडणवीस

मोदी सर्वांचा विचार करतात, त्यांचं मोठं कुटुंब आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी इतपत ते सिमीत नाही, संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत माझं कुटुंब, त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी अशा भावनेतून हा गरिब कल्याणाचा अजेंडा राबवत प्रत्येक मुलभूत गरज पूर्ण करण्याचं काम हे मोदींनी केलं, हे करत असताना भारताला त्यांना ज्या प्रकारे शक्तिशाली केलं

दोन आठवड्यात टोमॅटोचे भाव दुपट्ट, महाराष्ट्रात अनेक शहरात टोमॅटोचे दर 80 रुपयांवर, अतिउष्णकेमुळं उत्तरेकडील राज्यात टोमॅटोचं उत्पादन घटलं

आयपीएलमध्ये आज पहिला क्वालिफायर सामना.. आज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स सोबत भिडणार.. कोण मिळवणार IPLचं तिकीट टू फिनाले या कडे लक्ष..

पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद... तांत्रिक दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद.. पुणे महापालिकेची माहिती..

तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानांची युती.. दोन्ही पैलवानांची राज ठाकरें विरोधातली युती स्पष्ट.. मनसे नेते संदीप देशपांडेंची बृजभूषण आणि शरद पवारांवर खोचक टीका..

आसामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेत पीकांना फटका.. आसामच्या नागांव जिल्ह्यातील शेत पिके गेली वाहून.. शिल्लक पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष...

मुंबईतील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी... महालक्ष्मी, हाजीअलीसह इतर भागात रिमझिम पाऊस..

मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सतर्क.. संशयित रुग्ण आढळल्यास माहिती द्यावी.. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना सूचना..

दिल्लीच्या उपराज्यपाल पदी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती... अनिल बैजल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्यानंतर केली नियुक्ती..

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर.. मोदींनी क्वाडच्या शिखर परिषदेत केलं संबोधित..

मुंबईत आज भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक.. OBC आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा.. बैठकीला फडणवीस, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार उपस्थित..

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील LIVE

राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न, मनसे नेत्यांचे आरोप खोटे. शरद पवारांचा तो फोटो कुस्तीतल्या कार्यक्रमाचा, मनसेकडून बिनबुडाचे आरोप होत आहेत.

किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस- संजय राऊत

माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील - संभाजीराजे

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या, उकाड्यापासून तात्पुरता दिलासा

मुंबई: सलग दुसऱ्या दिवशी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत. हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकी विस्कळीत; पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंट्राग्राफमध्ये स्पार्क

बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणावर जिल्हा न्यायालयात सुनावणी 

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result