आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचा निकाल जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालय. त्याचा निकाल आज लागणार आहे. यात तीन शिक्षक तर दोन पद्वीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेवर पार पडल्यामुळे निकाल दुपारनंतर येणं अपेक्षित आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे. उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते मोजली जातील. त्यानंतर वैध आणि अवैध मतमोजली जातील. त्यानंतर वैध मतांच्या आधारावर विजयासाठीचा कोटा ठरवला जाईल. पहिल्या पसंती क्रमांकात कोणताही उमेदवार जिंकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मतमोजली जातील. ही निवडणुक प्रक्रिया पसंती क्रमांकानुसार पार पडली असल्यामुळे दुसरा आणि गरज लागल्यास तिसरा पसंती क्रमांक मोजला जाईल.