Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

Live Update : सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी... मुंबई आणि महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी जाणून घ्या...

Shweta Chavan-Zagade

सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस 

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आंदोलन मागे,राज्य सरकारने 15 जुलै पर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE

आजपासून एसटीची पहिली ई-बस धावणार. आपलं भविष्य घडवण्यात एसटी महत्त्वाची. एसटी कर्मचारी आमच्या कुटुंबातील सदस्य, करोना काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून उल्लेखनीय काम.

पुण्यातून शिवसेना नेते संजय राऊत LIVE 

भगवा आणि निळा एकत्र आल्याने महाराष्ट्राची ताकद दिसेल. बाबासाहेबांपासून जगाने प्रेरणा घेतली. पुणे महापालिकेवर भगवा फडकणार. लढणाऱ्या शिवसैनिकालाच जागा मिळणार. पुणे शहराला दिशा देण्याचं काम करायचं आहे. ज्यांनी अहंकार सोडला तो विजयी झाला. आपण टिकून राहिलो त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

पुणतांब्यातून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं 5 दिवस आंदोलन 

हिंगोली-परभणी राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात

हिंगोली-परभणी राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात... अपघातात दोन्ही दुचाकीचालक गंभीर जखमी.. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...

पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीला भीषण आग

पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीला भीषण आग... आगीमुळे परिसरात धुराचे लोट... सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही..

मुंबईत आता प्रत्येक बुधवारी असणार 'नो हॉकींग डे'

मुंबईत आता प्रत्येक बुधवारी असणार 'नो हॉकींग डे'.. मुंबई पोलिसांकडून विनाकारण हॉर्न वाजाविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम...

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चेनंतरही परिचारीकांचा संप सुरुच

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चेनंतरही परिचारीकांचा संप सुरुच... लेखी आश्वासन न मिळाल्याने संप सुरु ठेवण्याचा निर्णय.. 28 मे पासून परिचारिका बेमुदत संपावर..

मालेगावच्या दाभाडी येथे 24 वर्षीय तरुणाची हत्या

मालेगावच्या दाभाडी येथे 24 वर्षीय तरुणाची हत्या... मारेकरी मिळत नसल्यानं दाभाडीवासियांनी काढला कॅन्डल मार्च.. मारेकरी शोधा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, ग्रामस्थांचा इशारा..

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धु मूसेवाला हत्या प्रकरण

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धु मूसेवाला हत्या प्रकरण... सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक... आरोपी मनप्रीत याला 5 दिवसांची पोलीस कोठडी...

माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेच्या अर्जावर आज सुनावणी

माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेच्या अर्जावर आज सुनावणी.. मुंबई सत्र न्यायालयात विशेष सीबीआय आज मांडणार आपली भूमिका..

इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर आज होणार सुनावणी

इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर आज होणार सुनावणी... मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी.. मंजुळा शेट्टी प्रकरणा नंतर मारहाणीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी..

एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई आजपासून धावणार

एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई आजपासून धावणार... लोकार्पण सोहळ्यानंतर पुणे ते अहमदनगर असा करणार प्रवास.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार बसचं लोकार्पण...

ठाण्यात आज पाणीपुरवठा राहणार बंद...

ठाण्यात आज पाणीपुरवठा राहणार बंद... दुरुस्तीच्या कामानिमित्त उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार... नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं ठाणे पालिकाचं आवाहन...

अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या गाभाऱ्याच्या पायाभरणीला आजपासून सुरुवात.. योगी आदित्यनाथ करणार पायाभरणी.. अडीचशे साधू संत आणि राजकीय नेते राहणार उपस्थित..

देशात गेल्या 24 तासांत 2,745 नवे कोरोनाबाधित… 2,236 रुग्ण कोरोनामुक्त.. तर, 6 रुग्णांचा मृत्यू..

एलपीजी स्वस्त झाला

एलपीजी स्वस्त झाला. घरगुती गॅस सिलिंडर दर जैसे थे. १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त. व्यावसायिकांना मोठा दिलासा

हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद विमान मार्गावर फ्लाय बिग विमान कंपनीची सेवा आजपासून सुरू

हैदराबाद औरंगाबाद हैदराबाद विमान मार्गावर फ्लाय बिग विमान कंपनीची सेवा आजपासून सुरू करण्यात आली. विमानातून २३ प्रवासी हैदराबादकडे रवाना झाले तर हैदराबादहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या ३५ अशी होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादच्या संस्कृतीक क्रीडा मंडळावर सभा होणार आहे. याच सभा मैदानात आज शिवसेनेच्यावतीने स्तंभ पूजन करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बंडू ओक आदी पदीकरी उपस्थित आहेत. याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विराट सभा घेतली होती.

ओठांवर, चेहऱ्यावर जखमा.... KK यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं

प्रसिद्ध गायक केके (Singer KK) उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद अनैसर्गिक मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा