ताज्या बातम्या

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पेटला; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनावर हल्ला

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगाव दौरा करणार होते. मात्र तो दौरा त्यांनी पुढे ढकलला आहे. असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. संघटनेचे नारायण गौडा हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे.या संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. महाराष्ट्रही गेली अनेक वर्षे वादात आहे. निवडणुकीचा सीमावादाशी काहीही संबंध नाही. दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये सामंजस्य आहे आणि त्यात बाधा येऊ नये. सुप्रीम कोर्टात एक केस आहे आणि मला जिंकण्याचा विश्वास आहे. तसेच निवडणुका डोळ्यासमोर आल्याशिवाय वाद होणार नाही. आम्ही आमच्या सीमा आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी सरकार तयार आहे. असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...