कर्नाटक सरकारचं अधिवेशन सुरु असताना बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले असून स्टेज हटवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक देखील घेतली. आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले मात्र आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नाही, अशी कर्नाटक सरकारची भूमिका आहे या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केले आहे. त्यांच्या या मेळाव्याला मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.