Devendra Fadnavis  
ताज्या बातम्या

पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले; "स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार..."

"महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका दोन वर्षाच्या किंवा अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक लाख नोकऱ्या देण्याचा पारदर्शी पद्धतीने देण्याचा एक नवा विक्रम महाराष्ट्र सरकारने केला आहे"

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Press Conference : पारदर्शी पद्धतीनं आम्ही सर्व काम करत आहोत. ज्या थोड्या घटना झाल्या, त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार याठिकाणी सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की, याच अधिवेशनात हा कायदा याठिकाणी आम्ही मांडणार आहोत. जेणेकरुन पुढच्याही प्रक्रिया या पारदर्शी पद्धतीनं होतील. एक मागणी सातत्यानं येत होती, वर्ग क ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजेत. त्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि वर्ग क ची सर्व पदे ही एमपीएससीला वर्ग करण्यात येणार आहेत. ती पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येतील. महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका दोन वर्षाच्या किंवा अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक लाख नोकऱ्या देण्याचा पारदर्शी पद्धतीने देण्याचा एक नवा विक्रम महाराष्ट्र सरकारने केला आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, जो पेपर चुकला होता, त्यानंतर ती परीक्षा पुन्हा घेण्याचं ठरवलं होतं. अतिशय पारदर्शकतेनं ही परीक्षा पूर्ण झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात नवीन रेकॉर्ड आमच्या शासनाने तयार केला आहे. ऑगस्ट २०२२ नंतर ५७ हजार ४५२ तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र दिलेलं आहे. ज्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, महिनाभरात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल, अशी संख्या १९ हजार ८५३ आहे. ७५ हजार भरतीची आम्ही घोषणा केली होती, त्या विरुद्ध ७७ हजार ३०५ लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याच्या कामाची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. नियुक्तपत्र दिलेलं आहे आणि देण्यात येत आहे.

एकूण हिशोब लावला तर १ लाख ८ हजार नोकऱ्या या सरकारने अडीच वर्षांच्या टर्ममध्ये दिलेल्या आहेत. नवीन कायदे सुरु झालेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून अभिनंदन करतो. ब्रिटिशांनी जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने कायदे केले नव्हते. भारतीयांवर राज्य करण्यासाठी या कायद्यांच्या तरतुदी केल्या होत्या. पण भारताच्या संसदेने नवीन कायदे पास केले आणि ते कायदे आज लागू झाले आहेत. मी कायद्यांचं स्वागत करतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश