आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्याच तब्बल 2 हजार 701 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी हि चिंतेची बाब आहे. गेल्या 24 तासांत 2,701 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याने चिंतेत भर पडली असून, तर मुंबईत 1,765 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Corona Update)
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्क्यांवर नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 9,806 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक सक्रिय रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाचे 7,000 सक्रिय रूग्ण असून, ठाण्यात कोरोनाचे 1,482 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.