ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, कारण...

राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार का रखडला, याची माहिती समोर आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार का रखडला, याची माहिती समोर आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्यानं विस्तार रखडल्याची माहिती मिळाली आहे. विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्यानं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार आहे.

तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल. पण मी आणि उमुख्यमंत्र्यांनी जनतेकरता महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक प्रकल्प आम्ही राज्याच्या हिताचे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्यामुळं कुठंलही काम अडलेलं नाही, कुठेही बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय हा अमित शाह घेणार आहेत. पण अजून अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची चर्चा अजूनही झालेली नाही, म्हणून मंत्री मंडळ विस्तार रखडला असल्याची माहिती आहे. या चर्चेसाठी अमित शाह आणि एकनाश शिंदेच फक्त बसणार आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील नसणार अशी माहिती आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण