राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामसेवकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे.
ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. दहा हजार रुपयांची वाढ त्यांचा वेतनात आता करण्यात येणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन आहे ते थेट 16 हजार रुपये करण्यात आले आहे.