भाजपनंतर आता महाविकास आघाडीनेही रविवारी (11 Noveber ) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मविआने आपल्या जाहीरनाम्यात 100 दिवसांचा अजेंडा जाहीर केला. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा ४,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात महाराष्ट्रात नवे औद्योगिक धोरण बनवण्याबाबत सांगितले आहे. आज मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्राचा जाहीरनामा समोर आज ठेवत आहे.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि इतर सोयी सुविधा
मुलींसह मुलांनाही फीमध्ये सवलती देणार
महिलांसाठी एसटी प्रवास फ्री
शेतकऱ्यांच्या कृषी विजबिलात सवलत
जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर करणार
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार
जातनिहाय जनगणना करणार
6 सिलेंडर प्रत्येकी 500रुपयात करणार
बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांची आर्थिक मदत
मोफत औषधांची सुविधा