मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने मुसंडी मारली आहे. तर कॉग्रेस पिछाडीवर आहे. विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये भाजपचे शिवराज सिंह यांनी पुन्हा एकदा विजयी झाले आहे.
आकडेवारीनुसार भाजपनं १५७ जागांवर विजया दिशेने जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कॉग्रेसला पिछाडीवर आहे. आणखी काही जागांची मतमोजणी सुरु आहे. हे अंतिम हे अंतिम चित्र नसले तरी भाजपनं सत्ताधारी पक्ष म्हणून आपली मोहोर उमटवली आहे अशी चर्चा आहे. या सगळ्यात चर्चा सुरु झाली आहे ती मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री होणार कोण?
मध्य प्रदेशच्या राजकारणावर पकड असणाऱ्या शिवराज सिंह हेच पुन्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले जात आहे. परंतु ज्योतिरादित्य शिंदे आणि कैलास विजयवर्गीय यांची जुरसीची टक्कर असणार असही म्हटलं जात आहे. भाजप पक्षातील हे तीन नेते, आता मुख्यमंत्री पदासाठी भिडणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
यापूर्वी एका मुलाखतीमध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिनव कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले होते की, नवा मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतील नेते ठरवतील. पक्षांतील महत्वाचे नेते याविषयी चर्चा घेणार आणि त्यांचा निर्णय जाहीर करतील, त्यामुळे आपण त्यावर अधिक काही बोलणार नाही. जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.
पुन्हा शिव 'राज'....
कुणी काहीही म्हटलं तरी शिवराज यांची मध्यप्रदेशातील लोकप्रियता कमी होत नाही. त्यांचे पक्षातील स्थान आणि केंद्रीय मंत्र्यांशी असलेले संबंध पाहता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असे बोलले जात आहे. ही त्यांची पाचवी टर्म असून २०२४ च्या लोकसभा निवडणूकांपर्यत शिवराज यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाईल अशीही एक चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.
ज्योतिरादित्य शिंदेचा रोल काय?
मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. प्रश्न आहे तो मुख्यमंत्री होणार कोण, एकेकाळी मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे कॉग्रेस सोडून भाजपच्या गोटात गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना यावेळी संधी मिळेल असा भाजपमधील एक गट म्हणतो आहे. त्यांचे पक्षातील स्थान मोठे आहे.
चौहान किंगमेकर?
मध्य प्रदेशमध्ये किंग मेकर म्हणून नेहमीच लोकप्रिय ठरलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे शिवराज सिंह. चार दशकांहून अधिक काळ राजकीय नेतृत्वाचा अनुभव असलेल्या शिवराज यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पसंती मिळेल असे भाजपच्या वरिष्ठ गटाकडून सांगण्यात येत आहे. शिवराज यांना त्यांच्याच पक्षात मोठं आव्हान हे शिंदे यांनी तयार केलं आहे. पक्षांतर्गत तयार झालेले गट आणि शिंदे यांची तरूणांमधील लोकप्रियता यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशीही शक्यता आहे.
कैलाश विजयवर्गीयही तयार?
शिवराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर कैलास विजयवर्गीय यांचे नाव देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. त्यांनीही अप्रत्यक्षपणे आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत हे अनेकदा मुलाखती, जाहीर सभांमधून सांगितले आहे. इंदौर १ मधून उमेदवारी मिळाल्यानंतर विजयवर्गीय यांनी ज्याप्रकारे बोलण्यास सुरुवात केली त्यावरुन तेच आता मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत अशी वातावरण निर्मिती झाली. भोपाळमध्ये बसून आपण सगळी सुत्रं फिरवणार असं विधानही त्यांनी केलं होतं.