दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. आज नोव्हेंबर महिन्याचा पहिलाच दिवस असून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 62 रुपयांनी वाढ केली आहे. मुंबईमध्ये 19 किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1754 रुपयांना मिळणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांनी कपात करण्यात आली होती. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.