ताज्या बातम्या

LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा चटका! दिल्लीसह मुंबईतही LPG महागला!

आज 1 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०२३ पासून, एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे.

Published by : shweta walge

आज 1 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०२३ पासून, एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सुधारित केल्या जातात. आजही एलपीजीच्या किमती अपडेट करण्यात आल्या असून डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅसची किंमत कमी करण्यात आली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी १९ किलोच्या सिलिंडरच्या किमतीमुळे बाहेर खाणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

एलपीजी सिलेंडरच्या किमती IOCL वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या असून बदललेल्या किमती 1 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिवाळीपूर्वी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 103 रुपयांनी वाढ केली होती आणि 1 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्लीत त्याची किंमत 1833.00 रुपये झाली होती, मात्र 16 नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्तानं एलपीजी सिलेंडवर दिलासा देण्यात आला होता. आणि सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी कमी करत 1755.50 रुपये झाली होती, मात्र वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर पुन्हा एकदा 41 रुपयांनी वाढवले आहेत.

एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर 9.3 रुपयांना, कोलकात्यात 929 रुपयांना, मुंबईत 902.50 रुपयांना आणि चेन्नईत 918.50 रुपयांना उपलब्ध आहे. 

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का