इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना दुधासाठी 6 ते 12 रुपये कमी दर मिळत असल्याने त्याना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या राज्यात सरासरी दूध खरेदी दर 27 रुपये लीटर आहे. मात्र कर्नाटकात, गुजरात, आंध्र प्रदेशात, तेलंगणा, केरळ, पंजाबमध्ये प्रत्येकी लिटर मागे 6 ते 12 रुपये जास्त भाव दिलं जात आहे. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांवर हा अन्याय का असा सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
राज्याच्या विकासामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे. गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत. हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी.
महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला 42 रुपयापर्यंत भाव मिळत आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त 27 रुपये भाव मिळतो आणि हेच दूध कंपन्यांकडून ग्राहकाला 55 ते 60 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असं पंकज चंदनशिवे यांनी लोकशाही बोलताना सांगितलं आहे.