निसार शेख| चिपळूण: रत्नागिरी जिल्हयात चिपळूणजवळ लोटे एमआयडीसीतील डीवाईन केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने जवळपास सात कामगार होरपळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डिवाइन केमिकल कंपनीमध्ये फेब्रिकेशनचे काम सुरू असताना केमिकल सॉलवंटने पेट घेतल्याने हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेत सात कामगार होरपळले आहेत.
जखमी कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर व अप्रांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील सात ही कामगार यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबई ऐरोलीतील बर्णी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.दरम्यान या घटनेनंतर कंपनीने गेट बंद केले आहे. अनेकदा याठिकाणी आशा घटना घडत असतात यापूर्वीही आशा स्वरुपाच्या घटनांमध्ये अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.