राजकारण

Prakash Ambedkar: भाजपला साथ दिली या प्रश्नावर आंबेडकर भडकले

Published by : Dhanshree Shintre

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीसोबतच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केलं. वंचित बहुजन आघाडी वतीने गेले अनेक दिवस महाविकास आघाडीत त्यांच्या समझोता नाही असं आम्ही सांगत होतो, ते आता खरं झालं आहे. त्यांच्या मतदार संघात मतभेद अजून कायम आहे. फ्रेंडली फाईट होणारं होती, म्हणून आम्ही भुमिका मांडली होती, तुमचं भांडण मिटवा असं सांगितलं.

ज्या ठिकाणीं त्यांचा समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही गेल्यावर त्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थीती होती ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टीकोनातून आणि येती निवडणुक ही अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका असताना त्या ठिकाणी घेतल्या. खरगे ना पत्र लिहून सांगितल की मविआमध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्यातील सात जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत. एक कोल्हापूर दोन नागपुर दोन जागी आम्ही पाठिंबा देणारं अस सांगितलं होतं. एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांविरुद्ध लढत आहेत असे 14 ते 16 मतदार संघ आहेत. जिथे काँग्रेस किंवा एनसीपी लढली तिथं यांचं अस्तित्त्व आहे. जिथे लढले नाही तिथं अस्तित्त्व नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद म्हणून एक उमेदवारी मागत नाही अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षावरुन ही परिस्थिती स्पष्ट होते अशी परिस्थिती आहे. भाजपची तीच अवस्था आहे, ज्या मतदार संघात ते लढले तिथं प्राबल्य आहे पण जिथे लढले नाही तिथं प्राबल्य नाही आणि म्हणून ते प्राबल्य पळवावं म्हणून उमेदवार पळवण्याचं काम चालू आहे. प्रस्थापित आणि विस्थापित याच समन्वय या निवडणूकीत आणायचा प्रयत्न होता. राहुल गांधी यांच्या सभेत मला पाच मिनिट बोलण्याची संधी दिली.

प्रस्थापित लोकांनी सगळे पक्ष ताब्यात घेतले अशी परिस्थिती आहे. निवडणूक जवळ आल्याने आम्ही तयारी केली होती. त्या जोरावर या निवडणुकांत एक आघाडी म्हणून लढणार आहे. आमचा मुख्य मुद्दा, बाँड प्रकरण जगातला सगळ्यात मोठ घोटाळा आहे असे सांगितल जात आहे. हुकूमशहाला जन्म दिला जातोय. सुप्रीम कोर्टाने नोट बंदी बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. चार मतदार संघमधील लढाई भाजप विरूद्ध वंचितमध्ये असणार आहे. कोणाला तरी उभे करायचं म्हणूण बाकीचे उमेदवार उभे केलेत असे प्रकास आंबेडकर यांनी जाहीर केले.

मला सरळ तुम्ही मला माझं विधान द्यायचं कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आहे, कुठल्या चॅनलमध्ये आलेलं आहे की आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याच्यामुळे उगीच बिनबुडाचं म्हणणं चॅनलमध्ये आपण रिपोर्टर असल्यामुळे आपल्या रिपोर्टरपणाचा दुरुपयोग करु नका. भाजपला साथ दिली या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर भडकले. त्यांनी त्यांच्या संघटनेची भुमिका घेतली आमच्यावर फार फरक पडत नाही. काँग्रेसने दोन ठिकाणी कोल्हापूर आणि नागपूर येथे पाठिंबा मागितला म्हणूण दिला. पक्ष म्हणूण आम्हाला निवडणुका लढायला पाहिजे, आमचं आरोप आहे आमच्या आठ जागा काँग्रेसमुळे पडल्या. आम्ही सोबत आहोत की नाही हे महत्त्वाचं नाही. त्यांनी त्यांची भूमिका घेतली आहे. एमआयएम आमच्या साठी रुल्ड आउट आहे. आम्ही जे काँग्रेसला पत्र लिहिलं होतं पाठिंब्याचं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला जी दोन नावं कळवली त्या दोन उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिला आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

Local Mega Block : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांना दिसाला

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News