manda mhatre Team Lokshahi
राजकारण

हॉस्पिटलच्या मुद्द्यांवर मंदा म्हात्रे बॅक फुटवर; मोर्चा स्थगित करण्याची नामुष्की

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास मिरगणे |नवी मुंबई : हॉस्पिटलच्या मुद्द्यांवर भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला इशारा दिला होता. परंतु, आज त्यांच्यावर मोर्चा स्थगित करण्याची नामुष्की ओढवली आहे. मंदा म्हात्रे यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना भेटून आपला मोर्चा स्थगित करत आहे, असे सांगितले.

आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकार आणि सिडको यांच्या विषय आहे. राज्य सरकारने हॉस्पिटलसाठी जागा कोठेही द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाने त्या बॅकफूटवर गेल्या, अशी चर्चा नवी मुंबईत रंगू लागली.

नवी मुंबई शहरामध्ये महापालिकेचे अनेक हॉस्पिटल असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नाही. त्यामुळे पालिकेच्या हॉस्पिटलकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. रुग्णांना औषध विकत घ्यावी लागत आहेत. त्याबाबत पालिकांच्या आरोग्याकडे कुणीही लक्ष देताना दिसून येत नाही. नवी मुंबईत हॉस्पिटल असताना सुद्धा नवीन हॉस्पिटलची गरज काय असा सुद्धा प्रश्न नवी मुंबई शहरामध्ये विचारला जाऊ लागला.

सिडकोतर्फे महापालिकेला देण्यात येणाऱ्या भूखंडांवरून नव्या वादाला तोंड फुटले होते. सिडकोने हा भूखंड महापालिकेला मोफत द्यावा, पैसे भरून भूखंड मिळवणारे काही लोक पालिकेच्या तिजोरीवर डाका टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केला होता. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी हॉस्पिटलच्या भूखंड संदर्भामध्ये भूमिका मांडताना दिसून आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आमदार मंदा म्हात्रे यांची कोंडी केली. वैद्यकीय महाविद्यालय भूखंडावरून स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातच संघर्ष रंगला.

बेलापूरचे हे मैदान खेळासाठी राखीव ठेवले नाही तर त्यासाठी तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खेळाडूंनी दिला. या मैदानावर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्याचा घाट स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी घातला असून हा दुराग्रह त्यांनी मागे घेतला नाही तर मैदानासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण तसेच आत्मदहन करण्याची तयारी खेळाडू यांनी केली होती.

सरकारी नियमांनुसार सीआरझेड 1 आणि सीआरझेड 2 क्षेत्रावर कोणतेही बांधकाम होऊ शकत नाही, असे अनेक राजकीय नेत्यांच्या म्हणणे होते आमदार मंदा म्हात्रे यांना माहित नाही का, असा सवाल विचारताना दिसून आले. महाविद्यालय की क्रीडा मैदान तिढा सोडविण्यासाठी सर्वसमावेशक समिती गठीत करावी, अशी मागणी ठाकरे गटांकडून करण्यात आली होती. आगामी काळामध्ये मंदा म्हात्रे कोणती भूमिका घेतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा