राजकारण

Lok Sabha Election Exit Poll Result 2024: लोकसभा निवडणूक 2024 एक्झिट पोल निकाल कधी आणि कुठे पाहाल?

Published by : Dhanshree Shintre

लोकसभा निवडणूक 2024 साठी एकूण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या सात टप्प्यातील शेवटच्या टप्प्यासाठी शनिवारी म्हणजेच 1 जून रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर विविध चॅनल्सकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात येते. मात्र, त्यापूर्वी म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यावर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात येईल. आज 1 जून रोजी मतदान पार पडल्यावर संध्याकाळी 5 नंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्यामुळेच एक्झिट पोलची सर्वजण वाट पाहत असतात. या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात येतो. पण हा एक्झिट पोल कुठे आणि कसा पाहता येईल?

लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत बहुमताचा कल बाहेर पडण्याची शक्यता आहे. शेवटच्या ट्रेंडसह अंतिम निकाल 4 जून रोजी रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रत्येक जागेसाठी मतमोजणी पूर्ण होताच निवडणूक आयोगाकडून दिवसभरात जागानिहाय निकालही जाहीर केले जातील.

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल 2024 कधी आणि कुठे पाहायचे?

1 जून म्हणजेच आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही लोकशाही मराठी चॅनल आणि आमची लोकशाहीची वेबसाईट https://www.lokshahi.com/ येथे एक्झिट पोल पाहू शकता. तसेच आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्यासोबतच संपूर्ण देशातील लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल पाहायला मिळेल.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा