राजकारण

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप-शिंदे गटात असंतोष उफाळून येईल; खडसेंचा मोठा दावा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सुरेश काटे | कल्याण : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याचे कारण सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल व असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार करत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. एकनाथ खडसे कल्याणमध्ये आयोजित लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

सरकार स्थापन होवून सात महिने झाले. मात्र, या कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या कालावधीनंतर देखील 18 मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होवू शकत नाही जनसंपर्क कमी पडतोय. भाजप मधले अनेक आमदार व शिंदे गटातले सर्व आमदार मंत्री मंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला मंत्रिमंडळात घ्यावे हा पेच असल्याने मंत्रिमंडळाचे विस्तार होत नाही. एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की आपोआप असंतोष उफाळून येईल. त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबतो आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

सी सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील, असा दावा करण्यात येतोय. यावर एकनाथ खडसे यांनी म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झालं. त्यामुळे जनता या सरकारचा विरोधात मतदान करेल, अशी टीका खडसे यांनी केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

हा सर्वे सत्य परिस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता सरकार अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय घेतो यावर ते सरकार अवलंबून आहे. त्यांची टांगती तलवार या सरकारवर आहे. सरकार नावाला चालले असून सरकारमध्ये समन्वय नाही. मुळात राज्यात महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झालं. एका पक्षाला फोडणे पूर्ण पक्षाला एकत्र घेणे आणि त्या माध्यमातून हे सरकार स्थापन झालं.

अलीकडे राज्यात महागाई बेरोजगारी हे प्रश्न आहेत. इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जातात. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. महाराष्ट्रावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या मधला सर्वात मोठा भाग 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज किंवा हमी या सात महिन्यांचा काळात दिली आहे. विविध विकास कामाबद्दल हे कर्ज किंवा हमी आहे त्याबद्दल दुमत नाही. मात्र, राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय. एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय की त्याला त्याचा फारसा काही लाभ होत नाही. त्यामुळे या सरकारचा विरोधात मतदान करेल, अशा स्वरूपाचा संकेत या सी सर्वेच्या माध्यमातून दिला जातोय आणि मला वाटतं अलीकडचा कालखंडात राज्याची स्थिती आहे त्याचे प्रतिबिंब या सर्वेत दिसतेय, असे त्यांनी म्हंटले आहे.

लहुजी आजच्या बाबत हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजन राज्यभरामध्ये केला जात आहे. याबाबत बोलताना खडसे यांनी भाजप शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी खडसे यांनी लव्ह जिहाद होऊच नये किंवा अशा प्रकाराला विरोध केलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका समाजामध्ये राहिलेली आहे. परंतु, एका विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून विशिष्ट गटाच्या माध्यमातून हा मोर्चा काढले जातात आणि जशा जशा निवडणुका जवळ येतात तसेच या स्वरूपाचा जनआक्रोश मोर्चा किंवा धर्माच्या संदर्भातला कार्यक्रम असलेल्या कार्यक्रमांना वेग येतो आणि स्वाभाविकता त्याच्या माध्यमातून एक हिंदुत्व जागृत झालं तर त्याचा मतदानात लाभ होऊ शकतो अशा स्वरूपाचा राजकीय पक्षांचा हेतू असतो, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा