राजकारण

अमर काळेंची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 2 एप्रिलच का? जाणून घेऊया या मागचे कारण...

Published by : Dhanshree Shintre

भूपेश बारंगे | वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा मानला जात होता. मात्र यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सुटला गेला आहे. त्यामुळे मविआ गटाकडून येथे अधिकृत उमेदवार कोणाची वर्णी लागणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. याला काल पूर्णविराम मिळाला आहे. काल सायंकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने पत्रकार परिषद घेत राज्यातील पाच लोकसभा जागेवर अधिकृत उमेदवार घोषित केले. यात प्रामुख्याने वर्धा लोकसभेसाठी माजी आमदार अमर काळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी आमदार अमर काळे हे काँग्रेसचे नेते होते, मात्र त्यांनी शरद पवार गटात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवली.

वर्धा लोकसभा मतदारसंघ मविआ गटामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सुटला होता. त्यामुळे येथे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र यात अनेकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. बाहेरील पक्षातील उमेदवार देऊ नये, यासाठी शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र शरद पवार यांनी वर्ध्यातील नाराज नेत्यांना मुंबई येथील सिल्व्हर ओक भेटीसाठी बोलावून त्यांची समजूत काढली. यात शरद पवारांना यश आले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतल्यानंतर काल सायंकाळी त्यांना वर्धा लोकसभेची अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली. उमेदवारी घोषणा करण्यापूर्वी माजी आमदार अमर काळे यांनी उमेदवारी 2 एप्रिलला अर्ज दाखल करण्याचे संकेत दिले होते. वर्धा लोकसभेकरिता माजी आमदार अमर काळे हे येत्या दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अमर काळे यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 2 एप्रिलच का निवड केली. यामागचं कारण तसंच आहे. माजी आमदार अमर काळे यांच्या मातोश्रीचे 2 एप्रिलला "स्मृतिदिन" आहे. त्यांच्यावर आईचा आशीर्वाद सदैव राहत असल्याने हा दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडला असल्याचे लोकशाही मराठीला सांगितले.

मामाचा आशीर्वाद भाच्याच्या पाठीशी!

वर्धा लोकसभा निवडणूकमध्ये शरद पवार पक्षाकडे भाजपला तगडा उमेदवार नसल्याने भाजपच्या पैलवान उमेदवाराला आमनेसामने टक्कर देणार कोण असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पडल्यानंतर त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामूळे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बहिणीचा मुलगा म्हणजे अमर काळे हे अगोदर पासूनच काँग्रेस पक्षाचे आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दमदार उमेदवार नसल्याने त्यांचे माजी आमदार अमर काळे यांच्याकडे लक्ष गेले आणि त्यांना वर्धा लोकसभा निवडणुकीत रिंगण्यासाठी उमेदवारी घेण्याची ऑफर दिली गेली. मात्र काँग्रेस सोडचिठ्ठी देऊन हाती तुतारी घ्यायची कशी हा प्रश्न पडल्यानंतर माजी आमदार अमर काळे यांनी आपल्या कार्यकर्तेशी विचारणा केल्यानंतर त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी होकार दिला गेला. तुतारी चिन्हावर लढण्यासाठी माजी आमदार अमर काळे यांना त्यांचे मामाश्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोर लावल्याची चर्चा आहे. मामाच्या आशीर्वादाने भाच्याला उमेदवारी मिळाली असली तरी भाजपच तगडं आव्हान त्यांच्या समोर आहे. यात कोण विजयी होते याकडे आता लक्ष लागले आहे. मामाच्या आशीर्वादाने भाच्याचं चांगभलं होणार? हे निकलांनातर कळेल.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा