Ajit Pawar | Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी सरकारला ठणकावले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा झाली व रणनीती ठरवण्यात आली अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात आहे. पुरोगामी विचार घेऊन पवारसाहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हापासून यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी पुढे जात असतो. आमच्या पक्षात सर्व धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. घटना, कायदा, संविधानाला धरून देश आणि राज्य चालले पाहिजे या मताची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे जो काही बाऊ करतात त्याला काडीचा आधार नाही आम्ही पण अनेक वर्षे राज्यकर्ते म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर ठेवण्याचे काम पवारसाहेबांनी केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

आपल्या नागरिकांबाबत चुकीचे घडले असेल तर कारवाई केली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्षाचा असणारा उगीचच विरोधकांना त्रास देण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुणीही सहन करणार नाही. त्यामुळे असा प्रयत्न कुणी केला तर जनता हे बारकाईने बघत असते त्यामुळे आम्ही हे सहन करणार नाही. जाणीवपूर्वक गोवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला.

असे व्हायला लागले तर यावरून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळते आहे की, कशापद्धतीने गोवण्यात येत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्यातील राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल. असा अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा