नाशिक : शहरातील गोदावरी तीरावर लोकशाही न्यूज आयोजित बोला बिनधास्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संध्याकाळी सहाच्या सुमारास गांधी तलाव येथील यशवंत महाराज पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा प्रामुख्याने उद्देश म्हणजे नाशिक शहरातील नाशिककरांच्या समस्या सोडवण्याचा हा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाची सुरुवातच नाशिक महानगरपालिकेच्या भूसंपादन घोटाळ्यापासून झाली. वेगवेगळ्या प्रश्नानंतर पुन्हा नाशिक महानगरपालिकेच्या भूसंपादनाचा विषय निघाला आणि शिवसेना-भाजपमध्ये मोठा राडा झाला.
भाजपकडून शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर यांच्यावर भाजपकडून एकेरी भाषा एक उल्लेख केल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. मात्र वेळीच लोकशाही न्युज च्या टीमने मध्यस्थी करून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना वेगवेगळं करत कार्यक्रम थांबवला. मात्र यावरून एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे स्थानिक प्रश्नांवर नेत्यांना काहीच घेणे देणे नाही त्यांना फक्त आपलं पक्ष सर्वश्रेष्ठ वाटतो. सर्वसामान्यांच्या अडचणींबाबत राजकीय पक्षाला काहीच घेणं देणं नाही की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय