ताज्या बातम्या

Lokmanya Tilak Rashtriya Puraskar 2024: लेखिका सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

Published by : Dhanshree Shintre

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधा मूर्ती या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. नुकत्याच त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. मागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला होता. टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून हा पुरस्कार दिला जातो.

सध्या राज्यसभेचे अधिवेशन कामकाज सुरु आहे, त्यामुळे राज्यसभा खासदार सुधा मूर्ती पुण्यात येऊ शकणार नाहीत. त्यांच्या विनंतीला मान देऊन यंदा प्रथमच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी 6:30 वाजता हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनात होणार आहे. या पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र, 1 लाख रुपये असे स्वरुप असणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्नथला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील खासदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा