ताज्या बातम्या

इंडिया टुडेचा धक्कादायक सर्व्हे; मविआला येणार अच्छे दिन?

देशातील लोकसभा निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता जर का निवडणुका लागल्या तर कोणाची सत्ता येईल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

देशातील लोकसभा निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता जर का निवडणुका लागल्या तर कोणाची सत्ता येईल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर India Today-C Voter कडून एक सविस्तर सर्व्हे करण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आले होते की, देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार बनणार आहे. या प्रश्नाला उत्तर देताना बहुमत एनडीए सरकारच्या बाजूने आले आहे. म्हणजेच आता निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल.

आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे आणि हा सर्व्हे केलाय इंडिया टुडे मासिकाने. इंडिया टुडे मासिकाने केलेल्या मुड ऑफ नेशन सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर भाजप आणि शिंदे गटाला 14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2019 च्या लोकसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा लढवताना भाजपला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी लोकसभा निवडणूक युती म्हणून लढवली तर भाजपला जागांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा अंदाज इंडिया टुडे मासिकाने केलेल्या सर्व्हेतून दिसून येतोय.

देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएचे केंद्रात पुनरागमन होऊ शकते. सर्वेक्षणानुसार, एनडीएला 298 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर यूपीएला 153 जागा मिळू शकतात, इतर पक्षांना 92 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, एनडीएला 43 टक्के मते मिळू शकतात, यूपीएला 29 टक्के आणि इतरांना 28 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार आसाम, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला फायदा होताना दिसत आहे तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये यूपीएला फायदा होण्याची अपेक्षा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमतासह परतण्याची रणनीती तयार करण्यात गुंतले असताना, विरोधक 2024 मध्ये भाजपला कोंडीत पकडण्याची योजना आखत आहेत. दरम्यान, देशातील जनतेचा मत जाणून घेण्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणाला बहुमत मिळणार, याबाबत सर्वे सुरू आहे.

महाराष्ट्र (48 जागा) आणि बिहार (40 जागा) या दोन मोठ्या राज्यांमध्येही भाजपला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) आणि काँग्रेस यांनी लोकसभा निवडणूक युती म्हणून लढवली तर भाजपला जागांचे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. 2019 च्या निवडणुका पाहिल्यातर त्यानंतर एनडीए आघाडीला 353 जागा मिळाल्या. यामध्ये एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या, त्या या सर्वेक्षणात 286 वर आल्या आहेत. सर्वेक्षणात 2019 च्या तुलनेत एनडीएला 55 जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे, तर एकट्या भाजपला 17 जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA चा व्होट शेअर हा तब्बल 42.8 टक्के एवढा असेल. तर UPA चा व्होट शेअर हा 29.6 टक्के एवढा राहील.व्होट शेअरमध्ये फारसा काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे NDA च्या बाजूने पुन्हा एकदा कौल पाहायला मिळत आहे. तसेच सर्व्हेनुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा किमान 10 ते 11 जागा अधिक मिळू शकतात. म्हणजेच भाजपला 284 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना मिळून 191 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. यासोबतच देशातील जनता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर किती खूश आहे याबाबत देखिल सर्व्हे करण्यात आला या सर्व्हेतून असे समजते की, 45.8 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान म्हणून मोदींची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. तर 25.7 टक्के लोकांच्या मते त्यांची कामगिरी उत्तम आहे. तर 10.1 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मोदींची कामगिरी ही साधारण आहे.

या सर्व्हेत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दल लोकांना त्यांचे मत विचारण्यात आले तेव्हा 37% लोकांनी ही यात्रा पक्षाला मजबूत करण्यासाठी आहे, 29% लोकांनी जनतेशी जोडण्याचा हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले, तर 13% लोकांनी ही यात्रा सुधारण्यासाठी असल्याचे मत व्यक्त केले. राहुल गांधींच्या प्रतिमेमुळे काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही, असा विश्वासही ९ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे. पुढच्या प्रश्न या सर्व्हेत होता की, मोदी सरकारचे सर्वात मोठे यश काय आहे. इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्वेक्षणातील एनडीए सरकारच्या सर्वात मोठ्या यशाशी संबंधित प्रश्नानुसार, 20 टक्के लोक कोविड 19 हाताळणे ही केंद्रातील मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी मानतात. 14 टक्के लोकांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 हटवणे ही मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी मानली आहे. 11 टक्के लोक राम मंदिराच्या उभारणीला सरकारची मोठी उपलब्धी मानतात तर 8 टक्के लोक लोककल्याणकारी योजना मानतात. असे लक्षात आले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी