Live Update : Live Update : सर्व महत्वाचे अपडेट एका क्लिकवर
Shweta Chavan-Zagade
राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट
नवाब मलिकांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ
मलिकांच्या प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली यांच्या मुलाचं आज नाव ठेवण्यात आलं. त्यामुळे आता हेच नाव शिवतीर्थावर घुमणार आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे live
शाहू महाराज आणखी काही वर्ष असते तर राज्याचा कायापालट झाला असता - मुख्यमंत्री
शाहू महाराजांनी सर्व क्षेत्रात काम केलं - मुख्यमंत्री
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आज स्मृती शताब्दी सोहळा
प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराजांचे संबंध ऐकत मी मोठा झालो
ब्राह्ममी वृत्तींविरोधात शाहू महाराजांनी लढा दिला - मुख्यमंत्री
शाहू महाराज आणखी काही वर्ष असायला हवे होते - मुख्यमंत्री
अहमदनगर: पोहेगाव-कोपरगाव रोडवर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू, चार जण गंभीर
मुंबई: राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे कलम लावणे चुकीचे: उच्च न्यायालय
रत्नागिरी: भोंग्याच्या भुमिकेवरून धमकी आलेले मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर मुंबईत राज ठाकरे यांच्या भेटीला निघाले
टिटवाळा : खडवली स्थानकाजवळ मेन लाईनवर मालगाडीचे इंजिन बिघडल्याने मध्यरेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक
सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीतही 250 हून अधिक अंकाची घसरण झाली आहे. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
यंदा मान्सून भारतात १० दिवस लवकर दाखल होण्याची शक्यता
डोंबिवलीत आज वीज पुरवठा सहा तास राहणार बंद; सकाळपासून लाईट नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण
अहमदनगर: शिर्डीत आजही लाऊडस्पीकरविना काकड आरती; भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण
आजपासून केदारनाथ मंदिर भाविकासाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी
सातारा : माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर फलटणमध्ये गुन्हा दाखल
मुंबई : ठाकरे सरकारविरोधात तक्रार करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा दिल्लीत जाणार
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्वस्त, लोकप्रिय वसतिगृह पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी (वय ८८) यांचे गुरुवारी निधन झाले.
मुंबई : जातीच्या दाखल्याच्या प्रश्नावर समीर वानखेडे यांची मुंबई हायकोर्टात धाव. जातपडताळणी समितीने बजावलेल्या 'कारणे दाखवा' नोटीसला हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान.
पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दोन आरोपींना अटक
3 मे ला दुपारी चार वाजता करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर यांनी महेश कवडे या नावाने कंट्रोल रूमला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब असल्याचं सांगितलं होतं...
तसेच बॉम्ब कुठे ठेवला आहे, याची माहिती हवी असल्यास सात कोटी रुपये द्या अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली होती. मात्र त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दोन आरोपींना पुणे रेल्वे पोलिसांनी वाघोलीतून अटक केली आहे. करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.