देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये राहणाऱ्या एका 5 वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. महागाईबाबत तिने पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. मुलगी इयत्ता 1 मध्ये शिकत आहे.
ही चिमुकली छिब्रामाळ शहरात राहते. तिने पत्रात लिहिले की, माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता 1 मध्ये शिकते. मोदीजी, तुम्ही खूप महागाई केली, माझी पेन्सिल आणि खोडरबरही महाग केले आणि मॅगीची किंमत वाढवली. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मारते, मी काय करू? मुले माझ्या पेन्सिल चोरतात. असे पत्र तिने पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. छिब्रामाऊचे एसडीएम अशोक कुमार यांच्याकडून मुलीचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची पुष्टी झाली आहे. एसडीएम अशोक कुमार म्हणाले, ‘मी माझ्या वैयक्तिक क्षमतेनुसार या मुलीला मदत करण्यास तयार आहे. मला खूप आनंद होईल की जर कृतीने मला तिच्या अभ्यासासाठी किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या तर मी तिचा शब्द पाळत, या हुशार मुलीला मदत करण्यासाठी लगेच तिथे पोहोचेन.
चिमुकलीने लिहिलेले पत्र