आरोग्य हीच धनसंपत्ती
आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हाती आहे. दिवसाची सुरूवात प्रथिनयुक्त आहाराने करणे. आहारात फळे, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश
करणे. जेवणाच्या वेळा न चुकवता वेळेत जेवण करणे. आहारामध्ये तेलबिया, ड्रायफ्रुट्स, शुद्ध तूपाचा समावेश असणे आवश्यक आहे. तेलबिया, ड्रायफ्रुट्समधून
शरीराला विटमीन ई योग्य प्रमाणात मिळते. आयसीएमआर ICMR च्या सर्वेनुसार भारतात मधुमेहाची महामारी
मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी 2023 साली केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की भारतात सुमारे 101 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि आणखी 136 दशलक्ष लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. ही संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठी आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे तरूणांमध्ये अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. तरूणांना डायबिटीज, ह्रदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांना अगदी कमी वयातच सामोरे जावे लागत आहे. सध्या तरूण पिढीमध्ये या आजारांचे प्रमाण गंभीर आहे.
आधुनिकतेकडे वळताना घरातील अनेक कामे सोप्पी होऊ लागली. ऑफिसमध्ये 8-9 तास कामाची बैठी शैली, खाण्याच्या अयोग्य वेळा, दररोज आहारात जंकफूडचा समावेश यामुळे 19 ते 24 या वयोगटांतील तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, डायबिटीज या आजारांचा विळखा बसल्याचे पाहायला मिळते. ही चिंतेची बाब आहे. काही तरूणांना सतत सिगरेट. तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन यासारख्या व्यसनांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
शारिरिक व्यायामाचा अभावामुळे जिवनशैलीशी निगडीत आजारांना तरूण पिढी बळी पडताना दिसत आहे. कारण खाल्लेले जेवण पचण्यासाठी शरीराला हालचालीची गरज असते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे तरुणांमधील हृदयाशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.
आयसीएमआर ICMR च्या सर्वेनुसार भारतात मधुमेहाची महामारी
मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी 2023 साली केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की भारतात सुमारे 101 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि आणखी 136 दशलक्ष लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. ही संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठी आहे.
आरोग्य हीच धनसंपत्ती
आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हाती आहे. दिवसाची सुरूवात प्रथिनयुक्त आहाराने करणे. आहारात फळे, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करणे. जेवणाच्या वेळा न चुकवता वेळेत जेवण करणे. आहारामध्ये तेलबिया, ड्रायफ्रुट्स, शुद्ध तूपाचा समावेश असणे आवश्यक आहे. तेलबिया, ड्रायफ्रुट्समधून शरीराला विटमीन ई योग्य प्रमाणात मिळते.