भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC IPO) प्रारंभिक समभाग विक्री ४ मे २०२२ पासून होत आहे. ९ मे २०२२ पर्यंत गुंतवणूकदार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करत येणार आहे. या आयपीओचे वैशिष्ट म्हणजे एसआयसी पॉलिसी (LIC IPO)असणारा गुंतवणूकदारास दोन प्रवर्गातून अर्ज करता येणार आहे. एलआयसी पॉलिसीधारक व सर्वसामान्य गटातून अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकार 3.5 टक्के शेअरची विक्री करणार असून त्यातून 20 हजार 557.23३ कोटींचा निधी उभारणार आहे.
काय आहे शेअरची किंमत
IPO गुंतवणुकदारांसाठी शेअरची किमान आणि कमाल किंमत 902 रुपये ते 949 रुपये आहे.
एलआयसी विमाधारकांसाठी 60 रु. तर कंपनीचे कर्मचारी आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी 45 रुपयांची सूट आहे
गुंतवणुकीसाठी लॉट आहे 15 शेअरचा आहे.
शेअरचे अलर्टमेंट कधी
एलआयसीच्या शेअरची बाजारात प्रत्यक्ष नोंदणी 17 मेला होईल असा अंदाज आहे. आयपीओतून शेअर मिळाला की नाही हे 12 मे रोजी कळणार आहे. 16 मे रोजी या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर मिळणार आहे. 17 मे रोजी एलआयसीच्या शेअरचे भांडवली बाजारात पदार्पण होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते हवे
आयपीओ प्रमाणे तुमची जी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेत हे डिमॅट खातं असेल तिथे लॉग-इन करून आयपीओसाठी अर्ज करावा लागणार आहे. या अर्जात किती किमतीला शेअरचे किती लॉट विकत घ्यायचे आहेत, हे अर्जात नमूद करावं लागेल.
एलआयसी पॉलीसी असेल तर मिळेल सुट
एलआयसीची विमा पॉलिसी असेल तर अर्जात तसं नमूद करावं लागेल. ही पॉलिसी पॅन कार्डला जोडलेली असणं आवश्यक असेल. या जोडणीसाठी एलआयसीने फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिलेली होती. पॅन जोडलेलं असेल तर अर्जातल्या पॅन क्रमांकावर तशी पडताळणी करणं कंपनीला सोपं जाईल.
पॉलिसी किती जुनी असावी?
LIC ने 13 फेब्रुवारी रोजी DRHP दाखल केला होता त्यानुसार पॅन क्रमांक 28 फेब्रुवारीपर्यंत पॉलिसीशी जोडला गेला पाहिजे. जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला पॉलिसीधारक कोट्यामध्ये सूट मिळेल. जर पॉलिसी अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर असेल तर डिमॅट खाते देखील अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर ठेवले पाहिजे.
सर्व सवलती एकत्र मिळू शकतात का?
तुम्हाला किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 45 रुपये आणि पॉलिसीधारकांसाठी 60 रुपये सूट आहे. परंतु तुम्हाला फक्त एका कोट्यात सूट मिळेल. तुम्ही एकतर किरकोळ गुंतवणूकदाराकडून रु.45 किंवा पॉलिसीधारकाकडून रु.60 ची सूट घेऊ शकता.
किती लॉटसाठी अर्ज करता येईल
अर्जदार हव्या तितक्या लॉटची मागणी तुम्ही करू शकता. बाजारात आयपोओला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ही तरतूद विशेष कायदा वापरून कंपनीने केली आहे. पण, त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संधी वाढणार आहेत.