लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेत एलआयसी (LIC) या कंपनीचा आयपीओची (IPO) बाजारात येण्याची तारीख निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने एलआयसीचा आयपीओ (lic ipo)येणार असल्याची घोषणा बऱ्याच दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आयपीओ विकत घेण्यासाठी वाट पाहत आहेत. एलआयसी ही सरकारी कंपनी होती. परंतु एलआयसीचा आयपीओ बाजारात आणून सरकार या माध्यमातून मोठे भांडवल उभे करू इच्छिते. अनेक दिवसांपासून या विषयाची चर्चा सुरू होती.
एलआयसी आयपीओची साईज 40 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकतो. सरकार यापूर्वी एलआयसीच्या आयपीओमधून 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत होते. मात्र, आता ते फक्त 21,000 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, 9,000 कोटी रुपयांचा ग्रीन शू पर्याय लॉन्च केला जाईल, जो IPO चा एकूण आकार 30,000 कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो.
एलआयसीचा आयपीओ 2 मे रोजी लॉन्च केला जाऊ शकतो, असे न्यूजपेपर बिझनेस स्टँडर्डने एलआयसीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये एलआयसीच्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर सादर केला होता. LIC चा IPO आणण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ आहे. जर तो या तारखेपर्यंत आयपीओ आणू शकला नाही, तर त्याला आयपीओच्या मंजुरीसाठी पुन्हा सेबीकडे कागदपत्रे सादर करावी लागतील. यासह, त्याला एलआयसीचे डिसेंबर तिमाही निकाल आणि कंपनीचे नवीन एम्बेडेड मूल्य (Embedded Value) अपडेट करावे लागेल. ड्राफ्ट पेपरनुसार, LIC ची एम्बेडेड व्हॅल्यू सध्या 5.39 लाख कोटी रुपये आहे.