Laxman Jagtap Team Lokshahi
ताज्या बातम्या

Rajya Sabha Election 2022 : मतदानासाठी भाजप आमदार अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईकडे

Published by : shweta walge

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) मतदानास सुरुवात झाली आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्षाचे प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवडतील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) राज्यसभेच्या मतदानासाठी मुंबईत निघाले आहे. ते आजारी असल्याने सकाळी सुमारे साडेआठ वाजता मुंबईला अ‍ॅम्ब्युलन्समधून (ambulance) निघाले आहेत. त्यांच्यांसाठी एअर लिफ्टचीही (Air lift) सुविधा तयार ठेवण्यात आली होती.

आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानाला जाणार हे निश्चित झालं आहे.

एअर अ‍ॅम्ब्युलन्सही तयार ठेवलेली होती, मात्र हवामानात वारंवार बदल होत असल्याने डॉक्टरांनी महामार्गाने जाण्याचा सल्ला दिला आहे, म्हणून आमदार लक्ष्मण जगताप हे महामार्गाद्वारेच मुंबईला मतदानासाठी जातील. अ‍ॅम्ब्युलन्समधूनच ते प्रवास करतील.अशी माहिती त्यांचे बंधू शंकर जगताप ( Shankar Jagtap) यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन