ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, "हर घर दुर्गा" हे अभियान देशासाठी प्रेरणादायी

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

Published by : Team Lokshahi

उज्वला रौंधळ मुंबई, : हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी आहे. देशातील तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवात, कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था नामकरण आणि कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये एचपी कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटरचे उद्घाटन या विविध कार्यक्रमासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश सूर्यवंशी, राजस्थान रजपूत समाजाचे मुंबईचे अध्यक्ष भावेर सिंग राणावत, सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. श्याम अग्रवाल, अभिनेत्री अदा शर्मा यांची उपस्थिती होती.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने आज एक महत्त्वपूर्ण अभियान सुरू केले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कालावधीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहे त्यामुळे आर्थिक, सामाजिक बदल घडणार आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. नोबेल पुरस्कार मिळवत आहेत, कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर महिला कार्यरत आहेत‌. जर त्यांना हर घर दुर्गा या अभियानातून स्वसंरक्षणाचे धडे मिळाले तर समाजात अमुलाग्र बदल होतील. हर घर दुर्गा हे एक सशक्त अभियान आहे. यामुळे युवतींच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. हे अभियान पुढे संपूर्ण देशात जाईल हर घर दुर्गा अभियानातून महिलांच्या कौशल्य भर पडणार आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या अनेक वाटा देखील खुल्या होतील. संपूर्ण महाराष्ट्रात हर घर दुर्गा या अभियानातून एक नवा विचार घराघरात पोहचेल

लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला म्हणाले, राज्यातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात आले आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये एचपी कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले असून यामुळे कुशल मनुष्यबळ तयार होऊन देशाचा विकास होईल असेही लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला म्हणाले.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, हर घर दुर्गा हे अभियान मुलींना त्यांचे स्वसंरक्षण करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा पुढाकार आहे. हे अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील मुलींसाठी आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक नवरात्री मंडळाने हर घर दुर्गा कार्यक्रमाचे आयोजन करून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या अभियानामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये वर्षभर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींव्यतिरिक्त इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात, असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.

यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे पत्रकार योगिता साळवी, किल्ले संवर्धनासाठी संतोष हासुरकर, लहू लाड, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, विवेक चंदालिया यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेत्री आदर्श शर्मा यांनी युवतींना स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगणारे प्रात्यक्षिक देखील सादर केले.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड