सचिन अंकुलगे, लातूर
परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. लातूर तालुक्यातील मुरुड गावात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडत आहे.
मुरुड गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मुरुड येथील दत्त मंदिरात आश्रय देण्यात आला आहे. जवळपास 200 नागरिकांचे करण्यात आले स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदस्य पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे. मुरुड ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या मदतीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
मुरुड ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या जेवणाची सोय करण्यात आली असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे.