राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रात्री उशिरा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
लालू यादव (Lalu Prasad Yadav)दोन दिवसांपूर्वी पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानी पायऱ्यांवरून पडले होते, त्यामुळे त्यांच्या शरीराला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्या आधीच अनेक आजारांशी ते लढत होते. अशा स्थितीत दुखापतीमुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली.
लालू प्रसाद यादव दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शिडीवरून पडल्यामुळे त्यांचे शरीर तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे, त्यामुळे शरीर हालचाल करू शकत नाही. तेजस्वीने सांगितले की, एम्समध्ये त्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर पुढील उपचारांबाबत डॉक्टरांचे पथक निर्णय घेईल.
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav ) यांची मुलगी रोहिणी हिने वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच लालू यादव यांचे इतर फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लालूंची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी काही छायाचित्रे शेअर केली आणि लालू यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर बोलून त्यांचे वडील लालू यादव यांची प्रकृती जाणून घेतली.