अमोल धर्माधिकारी, पुणे
ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील खेड तालुक्यात 20 किलो मेफेड्रोन एमडी पकडले होते.
तसेच तर, आरोपींनी रांजणगाव येथील एका कंपनीत 132 किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे 10 ते 15 किलो एमडी तयार केल्याची माहिती मिळाली होती.
त्यात ललित पाटीलसह एकूण 22 जणांना अटक करण्यात आली होती. किरण काळे, अफजल सुनसारा, मनोज पालांडे, परशुराम जोगलर, राम गुरबानी, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा आणि राकेश खानिवडेकर असे जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.
न्यायालयात पोलिसांनी सादर केलेल्या अंमली पदार्थांचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत सादर न केल्यानमुळे तपास प्रक्रियेची पूर्तता झाली नाही. त्यामुळे न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी हा आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.