10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा आज निरोप घेणार आहे. दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे.
सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची आरती होणार असून सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची मोठ्या जल्लोषात विसर्जनाला सुरुवात होणार आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली.
29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं प्रस्थान होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोळी बांधवांकडून मानवंदना दिली जाते. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होत असतात. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.