अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.
या सोहळ्याला मात्र लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार नाही आहेत. राम मंदिर ट्रस्ट ने अडवाणी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले होते. मात्र लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार नाही आहेत. लालकृष्ण अडवाणी राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत.
सकाळी 10.55 वा. पंतप्रधानांचे राम जन्मभूमी परिसरात आगमन होईल. दुपारी 12.15 ते 12.45 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्राणप्रतिष्ठेचा शुभमूहूर्त 12.29.08 ते 12.30.32 आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. निमंत्रित पाहुण्यांची मंदिरात येण्यासाठी सुरुवात झाली आहे. राममंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर असणार आहे.