दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 'उदय' असं या चित्त्याचं नाव असून, त्याचे वय सहा वर्ष होते. काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता.
उदय या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची माहिती मिळू शकेल असे तेथिल अधिकाऱ्यांनी सांगितले.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली की, रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला आहे. असे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.